साबलखेड ते आष्टी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका दिवसात तिघे जन गाडीवरून पडून गंभीर जखमी. शासन मात्र अजून सुस्त झोपेतच.

 साबलखेड ते आष्टी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका दिवसात तिघे जन गाडीवरून पडून गंभीर जखमी. शासन मात्र अजून सुस्त झोपेतच.

दररोज घडत आहेत असंख्य अपघात.
मराठवाड्याची दुर्दशा कधी संपणार.







साबलखेड ते आष्टी या रस्त्यावर जळगाव येथील तालुका कृषी कार्यालय समोर हजारो खड्डे पडलेले आहेत.

या ठिकाणी खड्डे चुकत असतानाच कुत्रे आडवे आले आणि रस्त्यावर मोटर सायकल घसरून लोणी चे माजी सरपंच श्री. बाजीराव वाळके व पत्रकार, प्रेस फोटोग्राफर राजेंद्र आबा वाळके हे गंभीर जखमी झाले आहेत.

उजव्या हाताचे खांद्यातून हाड फॅक्चर झालेले आहे .त्याचप्रमाणे पायाला सुद्धा गंभीर जखमा झाल्या आहेत. लोनीचे मा .सरपंच बाजीराव वाळके यांना मुकामार व किरकोळ जखमा झाले आहेत तर राजेंद्र वाळके यांना नगर येथील मोठ्या दवाखान्यात सर्जरीसाठी ऍडमिट करण्यात आले आहे.

त्याच दिवशी आष्टी पंचायत समिती समोर नगर येथील साहिल शेख हे सुद्धा गाडीवरून पडल्यामुळे पायाचे हाड दोन ठिकाणी फॅक्चर झाले आहेत.

एका दिवसात असंख्य अपघात घडत असताना सुद्धा शासकीय यंत्रणा गाढ झोपेत कशी आहे हे समजायला तयार नाही.

कोणतेही सरकार आले तरी लोकांचा मात्र वेगवेगळ्या मार्गाने छळ सुरू आहे की काय असे वाटत आहे.

दरम्यान काल अहमदनगर येथे लोकनेते देविदास आबा धस यांनी दवाखान्यात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली.

जनतेनेच आता मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी करावी त्याशिवाय रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल असे दिसत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.