दुर्गंधीयुक्त कचऱ्याने धामणगावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात- दादा पवळ

 दुर्गंधीयुक्त कचऱ्याने धामणगावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात-  दादा पवळ 

----------------------------------------

         


          

----------------------------------------

धामणगाव (प्रतिनिधी): घनकचरा व तत्सम कचरा व्यवस्था नसून गावातील दवाखाने, व्यापारी, हॉटेल, मटन-चिकन विक्रेते केशकर्तनालाय इ. चा कचरा हा नदीपात्रा मधे व गावात जागोजागी कचरा टाकून प्रदूषण होत आहे याचा नागरिकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असून रोगराई पसरण्याचा गंभीर धोका उद्भवत आहे, तसेच नदीपात्रात जनावरे पाणी पिण्यासाठी नदीपात्रात जात असून प्लास्टिक, इंजेक्शन सुई, औषधाची पाकीट,इतर घाण त्यांच्या पोटात जाऊन विविध आजार होत आहे.

 तरी तालुका आरोग्य अधिकारी साहेबांनी तातडीने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील याची काळजी घ्यावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल.धामणगाव शहरातील सर्वच भागांतून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील पुलाच्या परिसरात टाकला जात आहे. परिणामी पुलाचा परिसरच आता धामणगाव ग्रामपंचायतिचा डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे ढीग च तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे . दवाखण्यातील कचरा . मटणाच्या दुकानातील कचरा.हॉटेल मधिल वेस्ट कचरा आदींचा समावेश राहतो. धामणगाव ग्रामपंचायती कडे कचरा व्यवस्थापन करण्याची उपाय योजना नसल्याने शहरात निघणारा कचरा पुलाच्या परिसरात आदित्य मशनरी या दुकानाजवळ टाकला जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच संपला नसून त्या कचऱ्यात सडणारे पदार्थ असल्याने  निघणाऱ्या दुर्गंधीमुळे धामणगाववासीयांना आता श्वास घेणे कठीण झाले आहे. अशात आता जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना यावर काही तोडगा काढावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दादा त्रिंबकराव पवळ व निलेश लोखंडे पा धामणगाववासीयांनी केली आहे. धामणगाव शहरातील सर्वच प्रभागांतून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील पुलावर आदित्य मशिनरी  परिसरात टाकला जात आहे. . तेथे सध्या कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. . परिणामी धामणगाव शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच नागरिकांना अशा दुर्गंधीयुक्त कचऱ्याने धामणगाववासीयांना आता श्वास घेणे कठीण होत आहे. यामुळे पूलावर आदित्य मशिनरी स्टोअर परिसरात कचरा टाकणे बंद करावे. धामणगाव परिसरातील नागरिकांकडून खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळ आदी समस्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.  जिल्हा व  तालुका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी  निवेदनात केली केली  आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.