*आ. प्रा राम शिंदेंचा दणका* *अनाधिकृत गौण खनिज प्रकरणी प्रांताधिकारी तहसीलदार निलंबित:*
जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण )
सध्या अहमदनगर जिल्ह्यातील अनधिकृत खाण आणि स्टोनक्रेशर मोठ्या प्रमाणावर आहेत याबाबत आमदार प्रा. राम शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. अनाधिकृत खाण व स्टोनक्रेशरवर प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी कारवाई करण्यात कुचराई केल्याचे आ.राम शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये कर्जतमध्ये काही कोटींच्या महसूलाचा प्रश्न उपस्थित केला. याप्रकरणी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना निलंबित केले असुन विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आदेश.सध्या जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन बंदच आहे. आ. राम शिंदे दणक्यामुळे झालेल्या कारवाईमुळे कर्जत जामखेड तालुक्यातील महसूल विभाग व अनाधिकृत खाण व स्टोनक्रेशर धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.



stay connected