कल्याण संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन थाटामाटा साजरा
आम्रपाली धेंडे
वाघोली पुणे येथे काल दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सैनिक कल्याण संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी सुभेदार,नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ शीतल ताई मालुसरे,थेट तेरावे वंशज रायबा शिवराज मालुसरे,रायबा फाउंडेशन चे संस्थापक श्री मनोहर भालेकर,पारगड किल्ला,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, पेडगावच्या धर्मवीरगडचे शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे गणपतराव शिर्के तसेच ECHS चे डायरेक्टर डॉ. कर्नल रणजित कटाकडे, कॅप्टन परशुराम शिंदे साहेब, सुबेदार श्रीमंत राठोड, सुबेदार चंद्रकांत गायकवाड, दुबे साहेब प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा दरम्यान सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, वर्धापन दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव साहेब, सचिव आनंद गोसावी साहेब, उपाध्यक्ष मारुती कुटे साहेब, संघटक कल्याण लगद यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वर्धापन दिनास माजी सैनिकांची व मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.





stay connected