बावी गावंचे लोक नियुक्त सरपंच नवनाथ गर्जे यांचा गोल्हार सराफच्या वतीने सत्कार
आष्टी। प्रतिनिधी
तालुक्यातील बावी ग्रामपंचायत निवडणुकीत स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे जनविकास पॅनलचे उमेदवार सौ संगिता नवनाथ गर्जे तब्बल २३१ मतांनी विजयी झाले आहेत.तर ५ सदस्य निवडून आले आहेत.त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या पॅनलचा धुवा उडवून दारूण पराभव पत्करावा लागला.या मध्ये सरपंच नवनाथ गर्जे व सदस्यांचा गोल्हार सराफच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आष्टी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता विजय गोल्हार यांचे गाव असून या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड भाऊसाहेब लटपटे यांच्या पॅनलने केला आहे.या निवडणुकीत सरपचसह ५ सदस्य विजयी झाले आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल आष्टी शहरातील प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी गोल्हार सराफ व गोल्हार कलेक्शनचे मालक उदयशेठ गोल्हार, राजूशेठ गोल्हार यांनी सरपंच यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड भाऊसाहेब लटपटे, संजय लटपटे, ऋषिकेश गोल्हार, योगिराज गर्जे, अंकुश सांगळे व बावी गावचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
stay connected