आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूका सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार - तहसीलदार विनोद गुंडमवार

 आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूका सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार - तहसीलदार विनोद गुंडमवार




आष्टी। प्रतिनिधी 

तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागला असून,या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज राहून या प्रक्रियेत महसूल व पोलिस तसेच सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी जोमाने काम केले तसेच सर्व राजकीय नेते,अपक्ष व सर्व पक्षांचे उमेदवार,पत्रकार व जनता या सर्वांच्या सहकार्याने हि निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात व सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडली असल्याने सर्वांचे आभार तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी मानले आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका खेळी-मेळीत पार पडतील असा विश्वास प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी आव्हान केले होते.आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड तालुका व त्यानंतर आष्टी तालुक्यात होत्या.त्याअनुषंगाने आम्ही प्रशासनाच्या वतीने निवडणूकीसाठी सज्ज होतो. तर १०९ ग्रामपंचायतच्या निवडणूका ही शांततेत खेळी-मेळीत पार पडल्या या निवडणुकीत सर्व प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, सर्व राजकीय नेते, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार,अपक्ष उमेदवार, पत्रकार, जनतेच्या व सर्वांच्या सहकार्याने हि निवडणूक शांततेत पार पडली असून सर्वांचे आभार तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी मानले आहे.व पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीतही सर्वांनी असेच सहकार्य करावे व खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत निवडणूक पार पाडावी अशी अपेक्षा तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी व्यक्त केली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.