'आनंदासाठी नाटक असावे' श्री. प्रसाद वनारसे, 'वाचनाचे आयुष्यात महत्त्व !' शिवानी रांगोळे

 'आनंदासाठी नाटक असावे' श्री. प्रसाद वनारसे, 'वाचनाचे आयुष्यात महत्त्व !' शिवानी रांगोळे



आम्रपाली धेंडे


नाट्यवाचन पारितोषिक वितरण समारंभ' मंगळवार दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी 'मातृभाषा अध्यापक संघ, पुणे' आणि 'माझं पुणं सुंदर पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नाट्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 'राष्ट्रभाषा प्रचार समिती, बाजीराव रोड, पुणे येथे संपन्न झाला. या समारंभास 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कर्ते श्री. प्रसाद बनारसे आणि सिने. व टी.व्ही मालिका प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडताना 'आनंदासाठी नाटक असावे' व'वाचनाचे आयुष्यात महत्व 'या विषयी आपले विचार मांडले. सदर नाट्यस्पर्धेत पुणे शहरातील एकूण  ४५ शाळांनी सहभाग घेतला होता.





'मातृभाषा अध्यापक संघाच्या अध्यक्षा सौ. स्मिता ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. संघाच्या उपाध्यक्षा सौ. हेमा भूमकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ. गायत्री साठे यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. संघाच्या कोषाध्यक्षा सौ. गीता भारती निमल व संचालिका सौ. शारदा पानगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संघाच्या सचिव सौ. संध्या माने आणि कार्याध्यक्ष  सौ. शामला पंडित ( दीक्षित ) यांनी पारितोषिकांचे वाचन केले. परीक्षक श्री. शंकर घोरपडे, सौ. सुरेखा सोनावणे, श्री. डाळींबकर, श्रीम. संगिता पुराणिक यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कोषाध्यक्ष सौ. गीताभारती निमल यांनी आभार 'मानले. 'माझं पुण सुंदर पुणे ' चे अध्यक्ष श्री. गोगावले योगेश त्यांनी कार्यक्रमास फोनवरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या कार्याध्यक्ष. सौ सुरेखा लेंभे यांनी केले .आभार निमल गीताभारती यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.