*सौ. वर्षा फटकाळे वराडे ठाणे यांना राष्ट्रीय विक्रमासह साहित्य साधना पुरस्कार.*

 *सौ. वर्षा फटकाळे वराडे ठाणे यांना राष्ट्रीय विक्रमासह  साहित्य साधना पुरस्कार.*





        ' गीता जयंती ' दिनाच्या शुभमुहूर्तावर हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने कै. काशीबाई यादवराव ( पाटील ) शेवाळे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा   दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी बहाई  अकादमी, पाचगणी, महाबळेश्वर येथील निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी हिरकणी साहित्य गौरव समूहाच्या संस्थापिका श्रीमती वनमाला यादवराव  पाटील यांच्या कल्पनेने समूहातील ३६  जिल्ह्यातील ३६ हिरकण्यांचे अष्टाक्षरी प्रकारातील वेगवेगळ्या विषयांवर आधारित ३६ संपादित पुस्तके तसेच इतर वैयक्तिक पुस्तके मिळून एकूण ६० पुस्तकांचे एकाच दिवशी एकाच ठिकाणी प्रकाशन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाची ' दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकार्डस् ' मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. यावेळी ठाणे येथील हिरकणी प्रतिनिधी सौ. वर्षा फटकाळे वराडे यांना संपादित पुस्तक प्रकाशनासाठी राष्ट्रीय विक्रमाचे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन गौरवण्यात आले . तसेच याचवेळी हिरकणी साहित्य समूहातील

सक्रिय सहभाग व लेखनाबद्दल सौ. वर्षा फटकाळे वराडे यांना प्रमुख पाहुण्यांचे स्थान देऊन ' हिरकणी साहित्य साधना ' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बहाई अकादमीचे लेसन आझादी, इंडियन रेकॉर्डस् चे सुनील पाटील, अध्यक्षा जागृती  निखारे, डाॅ. विद्या ठवकर  व वनमाला पाटील हे मान्यवर उपस्थित होते. 


        याप्रसंगी रंगलेल्या संध्याकालीन कविसंमेलनात सौ. वर्षा वराडे यांनी ' पेरणी ' ही कविता सादर केली. यावेळी त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय विक्रमाची नोंद व हिरकणी साहित्य साधना पुरस्कार अशा दुहेरी यशाबद्दल सौ. वर्षा फटकाळे वराडे यांचे चौफेर कौतुक सुरू असून आप्तगण व स्नेही जणांकडून कौतुक तसेच त्या परिचारीका असल्याने त्यांच्या कामावरही वरिष्ठ तसेच सहकर्मचारी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.