*ऊसतोड मजुराचा पोरगा पांढरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात!*
-------------------------------------
*रमेश भोगाडे यांना पांढरीकरांचे मतरुपी आशीर्वाद मिळणार*
----------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे आष्टी तालुक्यातील पंचक्रोशीत सर्व ज्ञान असलेली पांढरी गावच्या निवडणुकीच्या रिंगणात रमेश अशोक भोगाडे यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजवर सर्वांच्या सुखदुःखामध्ये युवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तसं पाहिलं तर अगदी ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील असल्याने आणि समोरून प्रस्थापित नेतेमंडळी उभी आहे परंतु सध्या जनतेचा कल ऊसतोड मजुराच्या मुलाच्या झोळीत असल्याचं चित्र आहे.
कोणतेही मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारा एक सर्वसामान्यांचा पोरगा सर्वच पांढरी करांचे मन जिंकून घेत आहे, त्यांच्या आई-वडिलांनी एक ते दीड दशक ऊसतोड मजूर म्हणून काम केले आहे. अत्यंत कष्टातून वर आलेल्या रमेश भोगाडे यांनी मागील एक दशकात विविध उद्योग व्यवसायातून आष्टी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जम बसून अनेक गावातील तरुण पोरं कामाला लावली आहेत. मेहनत, कष्टाळू, निर्व्येशनी, चारित्र्य संपन्न, नवसंकल्प चेहरा म्हणून सर्वच पांढरीकर त्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहेत. एकंदरीत पांढरीकरांच्या प्रतिक्रिया पाहता निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याचे चिन्ह दिसत आहे.
stay connected