*कडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजी माजी आमदारांचा कड्यात ठिय्या*
आष्टी ( प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कडा ग्रामपंचायतच्या निवडणूकीचा प्रचार आता रंगात आला आहे. आजी माजी आमदारानी आप आपल्या समर्थकांसाठी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
आष्टी तालुक्यातील बाजारपेठेचे सर्वात मोठे गाव अशी कडा गावाची ओळख आहे . 17 सदस्य असलेली कडा ही ग्रामपंचायत आता नगरपंचायतीच्या वाटेवर आहे . कडा ग्रामपंचायतची निवडणूक रविवारी होत असून सरपंच आणि सतरा सदस्य यांच्या निवडीसाठीच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे . या निवडणुकीसाठी तीन पॅनल द्वारे उमेदवार आपापले नशीब आजमावत आहेत. आ सुरेश धस , आ बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या समर्थकांनी आपापले पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. विविध आश्वासनावर निवडणूक लढवली जात असली तरी पाणी हा सगळ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे. आ धस गटाच्या लताबाई भीमराव पाटील , आ अजबे गटाकडून सुलोचना नारायण नाथ तर माजी आमदार धोंडे गटाकडून गिरिजा शंकर देशमुख सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या तीन दिवसात या तिन्ही आजी माजी आमदारानी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी रॅलीने या प्रचाराची सांगता होणार आहे.
stay connected