कोलकाता फिल्म फेस्टिवल मध्ये मराठमोळ्या ग्लोबल आगडगाव ची निवड
पश्चिम बंगाल सरकारमार्फत आयोजित कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये मराठमोळ्या सोलापूर जिल्ह्यातील अकुंबे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेते उद्योजक व निर्माते मनोज कदम यांनी वेगळ्या निर्माण केलेली क्रांतीकारी कलाकृती ग्लोबल आडगाव ची कोलकत्ता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन हे ब्रीद घेऊन चित्रपट निर्मिती क्षेत्रात ठेवलेले धाडसी पाऊल सर्वांच्या सहकार्याने आणि शुभेच्छा पाठीशी असल्याने यशस्वी होत आहे . यातूनच ग्लोबल आडगाव हा ६०० पेक्षा जास्त आणि सयाजी शिंदे , अनिल उषा नाडकर्णी रोनक लांडगे, विष्णू भारती, फुलचंद नागटिळक, महेंद्र खिल्लारे, अशोक कानगुडे, अनिल राठोड, सिध्दी काळे, वैदेही कदम, स्नेहल कदम आणि बरेच दिग्गज कलाकार व या क्षेत्रातील तज्ञ तंत्रज्ञ लोकांना सोबत घेऊन लेखक दिग्दर्शक डॉ अनिलकुमार साळवे आणि सहनिर्माते उद्योजक अमृत मराठे यांना सोबत घेऊन हा चित्रपट पूर्ण सेन्सॉर झाला आहे. आणि अतिशय आनंदाची बातमी अशी की.... चित्रपट सृष्टीतील जागतिक पातळीवर मोजकेच चित्रपट महोत्सव दर्जात्मक आणि पारदर्शक आहेत त्या पैकी पश्चिम बंगाल सरकार मार्फत आयोजित 'कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल हे प्रचंड दर्जाचे फेस्टिवल आहे, आणि या फिल्म फेस्टिवल मध्ये सिल्व्हरओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित बहुचर्चित ग्लोबल आडगाव २० डिसेंबर आणि २२ डिसेंबर ला चित्रपट होणार आहे मराठीतील हा एकमेव चित्रपट निवडला गेला आहे. अशी माहिती श्री फुलचंद नागटिळक यांनी दिली आहे.
stay connected