*काल केज तालुक्यात तीसऱ्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत २२८ उमेदवारी अर्ज दाखल*

 *काल केज तालुक्यात तीसऱ्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत २२८ उमेदवारी अर्ज दाखल*

केज (प्रतिनिधी)


आज केज तालुक्यात तीसऱ्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत २२८ उमेदवारी अर्ज दाखल

तिसऱ्या दिवशी अखेर पर्यंत एकूण ३५१ अर्ज दाखल


 केज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण २२८ उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. त्या पैकी ३७ सरपंच पदासाठी तर १९१ सदस्य पदासाठी अर्ज दाखल आहेत.

केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत अर्ज दाखल करण्याच्या तीसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी ३७ तर सदस्य पदासाठी १९१ अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण २२८ अर्ज दाखल झाले आहेत.

तीन दिवसात सरपंच पदासाठी एकूण ७२ तर सदस्य पदासाठी २७९ असे एकूण ३५१अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अद्याप पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसलेल्या २५ ग्रामपंचायती आहेत. अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक प्राधिकृत अधिकारी लक्ष्मण धस यांनी दिली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.