*औरंगाबाद येथील रामकृष्ण हाॕस्पीटलमध्ये १०१ रुग्णांची लिंग-बदल शस्त्रक्रिया यशस्वी* *----- डाॕ.संदीप हंबर्डे*

 *औरंगाबाद येथील रामकृष्ण हाॕस्पीटलमध्ये १०१ रुग्णांची लिंग-बदल शस्त्रक्रिया यशस्वी*
*----- डाॕ.संदीप हंबर्डे*


************************



************************

आष्टी (प्रतिनिधी)

औरंगाबाद  सिडको येथील रामकृष्ण हॉस्पिटल येथे गेल्या ११ वर्षात ५५० बालकांचे लिंग विषयक आजारांचे रोग निदान करण्यात आले.त्यापैकी १०१ रुग्णांची लिंग-बदल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.मराठवाडा व विदर्भातील गोरगरीब जनतेसाठी हे वरदान ठरलेले असल्याची माहिती बालरोग शल्यचिकित्सक  डाॕ,संदीप हंबर्डे दिली. या शस्त्रक्रिया आष्टीचे सुपुत्र डाॕ.संदीप रामकृष्ण हंबर्डे  यांनी केल्या आहेत.अतिशय छोट्या रुग्णालयात या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्याबद्दल त्यांना २०१९ मध्ये डॉ. अब्दुल कलाम पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे.लिंग संभ्रम ( disorder of sexual differentiation) हा वैद्यकीय क्षेत्रातील दुर्लक्षित आजार आहे. त्याचा समूळ उपचार करून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना नवसंजीवनी देण्याचा ध्यास डॉ.संदीप हंबर्डे यांनी घेतला आहे. हा आजार १.१५००० बालकांमध्ये पहायला मिळतो.रुग्णाचा जेनेटिक-

सेक्स,बाह्य-अवयव सेक्स,

मानसिक सेक्स यात तफावत होऊन वेगवेगळी लक्षणे आढळतात.प्रकार-१ )- ४६xx डीएसडी,२) ४६ xy डीएसडी,३) OVOTESTICULAR डीएसडी,४) MIXED GONADAL DYSGENESIS

यात काही बालकांमध्ये जन्मानंतर लगेच निदान करता येते तर बऱ्याच बालकांना वयात येताना ११ ते १४ वयोगटात शारीरिक व मानसिक बदल जाणवतात.

जेनेटिक तपासणी व संप्रेरकांचे प्रमाण, एम.आर.आय व गोनॅडोस्कोपी करून रोग-निदान करता येते.वेळीच शस्त्रक्रिया करून सर्वसामान्य आयुष्य असे रुग्ण जगू शकतात.शस्त्रक्रिया करून जननेंद्रियांमधील कर्करोग टाळता येतो. संप्रेरके देऊन त्या पद्धतीचा शारीरिक व मानसिक बदल साधता येतो असे रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. विवाह करून वैवाहिक जबाबदारी पार पाडू शकतात.आई बाबा बनण्यावर प्रश्नचिन्ह असते कारण आंतर-अवयव व बिजांड शाबूत व कार्यरत असल्यासच ते शक्य असते. बरीच रुग्ण सामाजिक दडपणामुळे वैद्यकीय मदत घेणे टाळतात व भविष्यात नैराश्याला सामोरे जातात.





त्यामुळे योग्य सल्ला घेऊन सर्वसाधारण आयुष्य आपण जगू शकतो ही भावना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रुजवणे महत्त्वाचे मानले जाते.अशा रुग्णांना कुटुंबातील घटकांचा व समाजाचा मानसिक आधार मिळणे गरजेचे आहे.या आजाराची जनजागृती करण्याची मोहीम डॉ.हंबर्डे यांनी हाती घेतली आहे.अशा आजाराच्या अनेक रुग्णांची विनाशुल्क शस्त्रक्रिया डॉ.संदीप हंबर्डे यांनी केलेल्या आहेत.मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून रुग्णांना मदत मिळवून त्यांचा आयुष्य सकारात्मक बनवलं आहे.

जन्मजात बालक किंवा वयात येताना बालकांमध्ये काही शारीरिक किंवा मानसिक बदल जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन डॉ.संदीप हंबर्डे यांनी  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.