माझ्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा राजकीय बदनामीच्या षडयंत्राचा भाग... ******************************* चौकशीतून दूध का दूध आणि पानी का पानी होईल... ******************************* आमदार सुरेश धस यांचे प्रतिपादन

 माझ्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा राजकीय बदनामीच्या षडयंत्राचा भाग...
*******************************
चौकशीतून दूध का दूध आणि पानी का पानी होईल...
*******************************
आमदार सुरेश धस यांचे प्रतिपादन 

*********************************




*****************************

आष्टी (प्रतिनिधी)

माझ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला गुन्हा हा माझ्या राजकीय बदनामीसाठी रचलेल्या षडयंत्राचा भाग असून कोणत्याही चौकशीसाठी आपण तयार असून तपासी यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.आष्टी येथे एका विशेष पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

 ते पुढे म्हणाले, आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमिनी माझ्या आणि माझ्या कुटुंबातील कोणाच्याही नावाने नाहीत आणि पत्नी आणि बंधू यांच्या जमीन खरेदी बाबतची माहिती ही हास्यास्पद असून सदरील जमीन कदम आणि निकाळजे कुटुंबीयांकडून रितसर खरेदी करण्यात आलेली असून त्यानंतर त्यामध्ये प्लॉटिंग करण्यात आलेली आहे. आष्टी तालुक्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव ही धर्मादाय संस्था असून या संस्थेमध्ये मी सन २००७ पासून सदस्य असून आणखी त्यामध्ये दहा-अकरा सदस्य आहेत. ही संस्था धर्मादाय विश्वस्त संस्था असून सर्व व्यवहार संस्थेच्या नावे जमीन खरेदी आलेली आहे. आष्टी येथील विठोबा देवस्थान या संस्थेच्या अध्यक्षपदी कोर्ट रिसिव्हर यांनी माझ्या पत्नीला अध्यक्षपदी नियुक्ती केलेले आहे.आष्टी येथील पिंपळेश्वर देवस्थान हे महादेव देवस्थान असून या संस्थानचा अध्यक्ष म्हणून मी सन २०११ पासून काम पाहत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम करण्यात येत असून या संस्थेच्या जागेमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा ही संस्थानमार्फत चालवण्यात येत असून याच संस्थेच्या जागेमध्ये सार्वजनिक उपयोगासाठी व्यायाम शाळा आणि वस्तीगृहासाठी इमारतीचे बांधकाम केलेले आहे. यामध्ये कोणत्याही खाजगीरित्या माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी काहीही करण्यात आलेले नाही. तक्रारदाराने अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीवर आधारित ही तक्रार केलेली आहे कारण प्लॉटिंगचा केलेला उल्लेख इतरत्र जमिनीबाबतचा आहे सदरील जमीन खाजगी मालकांकडून खरेदी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये देखील माझा कुठलाही सहभाग नाही चुकीच्या माहितीवर आधारित ही तक्रार आहे.उच्च न्यायालयाचे आदेशामुळे गुन्हा दाखल झाला असला तरी याबाबत तपास यंत्रणेला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असून या चौकशीतून दूध का दूध आणि पानी का पानी होणार असल्यामुळे सर्व सत्य बाहेर येणार आहे. हा गुन्हा माझ्या यापूर्वीच्या पक्षातील राजकीय प्रवृत्तींनी द्वेषबुद्धीने आणि राजकीय सूड भावनेतून तक्रारी दाखल केलेल्या आहेत. कोणत्याही लोकप्रतिनिधीला यापुढे अशा प्रकारच्या प्रवृत्त्तीला तोंड द्यावे लागणार असून प्रत्येक तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. त्यांना अशा प्रकारच्या तक्रारीतून गुन्हा दाखल करण्याची संधी मिळू शकते कारण लोकप्रतिनिधी हा कोणत्या ना कोणत्या संस्थेमध्ये सदस्य असतो त्याचे विरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार करायची हा विभाग शासनाकडे परवानगी मागतो शासनाची परवानगी मिळाली नाही की लगेच तक्रारदार न्यायालयाकडे दाद मागतो आणि न्यायालय गुन्हा दाखल करण्याचा आदेश देते आणि गुन्हा दाखल होतो याचा फायदा काही अपप्रवृत्तींना होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलावून दाखवली. पुढे धस म्हणाले की, माझ्या राजकीय बदनामीची ही क्लुप्ती असून राजकीय षडयंत्राचा भाग आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारची अपसंपदा नाही तसेच जास्तीची  कमावलेली संपत्ती देखील नाही माझ्या संपत्ती पेक्षा माझ्यावर कर्ज जास्त असून या कर्जाबाबत देखील तक्रार करण्यात आलेली आहे. आष्टी येथील बाजार समितीच्या जागेबाबत देखील न्यायालयाचे आदेशाने मूळ जमीन मालकाला मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रक्रिया होऊन या जमिनीचे मूल्यमापन होऊन विक्री करण्यात आलेली असून यामध्ये पारदर्शीपणाने व्यवहार झालेला आहे त्याला देखील भ्रष्टाचार असे संबोधण्यात आलेले आहे या अगोदरच प्रकरणांची पोलीस उपअधीक्षक आष्टी आणि त्यानंतर विशेष तपास पथक स्थापन करण्यात येऊन त्यांनी तपास करूनही त्यांना या सर्व प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही अजूनही सर्व चौकशीसाठी आपण तयार असून यापुढे सर्व लोकप्रतिनिधींना मात्र अशा प्रकारचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांमार्फत त्रास होऊ शकतो असे सांगून त्यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.