शीर्षक नाही

 *नागपुर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर आम आदमी पार्टीच्यात मोर्चात स्वखर्चाने 7000 कार्यकर्त्यांचा सहभाग*.                           माजी सैनिक अशोक येडे                  ______________________________ *या मागण्यावरून विधिमंडळात चर्चा  झाली नाही तर मुंबई येथे होणाऱ्या उन्हाळी अधिवेशनावर 50 हजार कार्यकर्त्यांचा महामोर्चा*         



                        ____________________________                   


बीड _आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर येथे होत असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्रातील प्रश्न घेऊन महाराष्ट्राचे राज्य संयोजक माननीय रंगा राचुरे व महाराष्ट्राचे प्रभारी दीपक सिंगल यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा काढण्यात आला यामध्ये माजी सैनिक आशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले राज्यात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने काही प्रमाणात मदत जाहीर केली परंतु ती फार अल्पशी आहे. दुसरीकडे विमा कंपन्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाहीत, बरेच चुकीचे धोरण वापरण्यात येत आहे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर सुद्धा मदत मिळत नाही, उलट शेतकऱ्यांकडून विमा रक्कमेपोटी हजारो रुपये भरून सुद्धा झालेल्या नुकसानाचा मोबदला मिळत नाही, विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात, .

तसेच राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा फारच खालावला आहे, त्यामुळे शाळांमधील पट संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, यावर आपण सुधारणा करा   सरकार कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे राज्यातील बिना अनुदानित शाळा भरमसाठ शुल्क आकारणी करतात आणि RTE च्या नियमांचे पालन करीत नाहीत.

राज्यातील अनेक सरकारी कार्यालयात पदे रिक्त आहेत, गेल्या अनेक वर्षात पद भरती झालेली नाही, त्यामुळे सरकारी कार्यलयात नागरिकांचे कामे वेळेवर होत नाहीत. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून अंश कालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले नाही.

एकूणच राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, पालक, सुशिक्षत तरुण यांना जीवन जगणे सुसह्य व्हावे म्हणून आम आदमी पार्टी ने खालील मागण्या घेऊन संपूर्ण महामोर्चा काढण्यात आला

संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई प्रती हेक्टरी ५० हजार देण्यात यावी.  पिक विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करावे. महाराष्ट्रात या सरकारने वॉटर ग्रेड योजना राबवून योजना जाहीर केली होती तिच्यावर अंमलबजावणी करण्यात यावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात.

शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देण्यात यावे.

शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा मोफत करावा, थकीत वीज बिल व शेती कर्ज माफ करावे.सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घावेत, अंश कालीन कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करण्यात यावे.

 सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार कराव्यात, कमी पट संख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही याची हमी द्यावी.

खाजगी शाळा प्रशासनाकडून पालकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शुल्कावर नियंत्रण आणावे व शिक्षण अधिकार कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात यावी. पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी व बिगर आदिवासिंना वन जमिनीचे पट्टे देण्याचा प्रश्न निकाली काढून वाहितदारांना पट्टे देण्यात यावे.वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वाव असलेल्या कायद्यात बदल करावा.अतिथी शिक्षकांना सेवेत नेमणूक द्यावी.





गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडून या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत, मात्र अद्यापही या मागण्यांवर विचार झाला नाही परंतु सरकारने  या मागण्यांना पूर्ण करावे अन्यथा खुडच्या खाली कराव्यात. हे सरकारला खडकावून सांगण्यासाठी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आम आदमी पार्टी या मागण्यांना घेऊन राज्यव्यापी जन मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रातून कार्यकर्ते पदाधिकारी स्वतःच्या खर्चाने 7000 कार्यकर्त्यांचा मोठा जनसमूह या सरकारच्या विरोधामध्ये उभा दिसला यामध्ये बीड जिल्ह्यातून माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष सचिव रामधन जमले शहर अध्यक्ष सय्यद सादेक परळी तालुकाध्यक्ष व्यंकट मुंडे केज तालुका अध्यक्ष नाशेर मुंडे पाटोदा तालुका अध्यक्ष पोपट बेंद्रे आष्टी तालुका अध्यक्ष डॉक्टर महेश नाथ मिलिंद पाळणे संदिप झिंजुर्के प्राध्यापक राम बोडके इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.