आष्टी पाटोदा तालुक्यातील १०३ नवनिर्वाचित सरपंचांनी घेतली आ.सुरेश धस यांची सदिच्छा भेट ******************************आ.धस यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित गावकारभाऱ्यांची मोठी उत्साहापूर्ण गर्दी
*************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील ८० आणि पाटोदा तालुक्यातील २३ नवनिर्वाचित सरपंचांनी आ.सुरेश धस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करून आभार व्यक्त केले आहे.या भेटीसाठी आ.धस यांच्या "अद्वैतचंद्र" निवासस्थानी गाव कारभाऱ्यांची मोठी उत्साहापूर्ण गर्दी शनिवारी पाहायला मिळाली.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,आष्टी, पाटोदा आणि शिरूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी घवघवीत यश मिळवले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे असल्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेले आ.सुरेश धस शनिवार दि.२४ डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध असल्याचे समजताच आष्टी तालुक्यातील ८० आणि पाटोदा तालुक्यातील २३ नवनिर्वाचित सरपंचांनी नवनिर्वाचित सदस्यांसह आमदार सुरेश धस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. आमदार महोदयांनी देखील त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आष्टी येथील अद्वैतचंद्र या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीपैकी ८० ग्रा. प.सरपंचपदी आणि पाटोदा तालुक्यातील एकूण २८ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायत सरपंचपदी आमदार सुरेश धस यांचे समर्थक विजयी झालेले आहेत.या सर्व विजयी सरपंच यांच्यासह सर्व विजयी सदस्य आणि पराभूत झालेले उमेदवार देखील शनिवारी उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेश धस यांनी प्रत्येक सरपंच आणि ग्रामपंचायत येथील उमेदवार यांचे अस्थेवायिकपणे चौकशी करून त्यांच्या विजयाचा परामर्श घेतला. सर्व उपस्थित नवनिर्वाचित सरपंचांना त्यांनी पुढील वाटचालीस आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
stay connected