मुदखेड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा

 मुदखेड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा




मुदखेड येथे दि २६ नोव्हेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून पहिल्या प्रथम संविधान दिनानिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच शासकीय विश्रामगृह येथे मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या हस्ते संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

यावेळी उपस्थित असलेले मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, गटनेते माधव कदम, माजी. उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे,माजी. नगरसेवक कैलास गोडसे, गंगाधर डांगे, चांदु चमकुरे, रावसाहेब चौदंते, चांदु बोकेफोड, संपादक अजगर हुसेन, शेख इमाम साहब,  मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख जब्बार, मनोज कमटे, ईश्वर पिनलवार शिवसेना शहर प्रमुख अविनाश झमकडे, सचिन चंद्र, अंकुश मामीडवार, भोकर विधानसभा संघटक गोविंदराव पाटील शिंदे वाईकर, सुधाकर देशमुख, शिवानंद देवके, काँग्रेस युवा मुजीब पठाण, एम आय एम चे मोहम्मद हुसेन, शिवसेना सोशल मीडिया संभाजी पाटील दरेगावकर, पत्रकार साहेबराव हौसरे, साहेबराव गागलवाड, प्रल्हाद मस्के, दिनेश शर्मा, रुखमाजी शिंदे, संतोष दर्शनवाड, अब्दुल रजाक,हफीस कुरेशी, पोलीस कर्मचारी रामदास आवळे आदी ची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन मुदखेड  तालुका   मराठीत पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.