*केज तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीसाठी उमेदवार शोधताना पॅनल प्रमुखांची उडतेय तारांबळ.*

 *केज तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीसाठी उमेदवार शोधताना पॅनल प्रमुखांची उडतेय तारांबळ.*





केज  (प्रतिनिधी) : 


केज तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र यावेळी सरपंचांची निवड थेट जनतेतून होत असल्याने ग्रामपंचायत अस्या व्हायला फारसे लोक इच्छुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्याच पॅनलमधून उमेदवारी देण्यासाठी त्याची मनधरणी करण्याची वेळ पॅनल प्रमुखांवर येत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तयार झालेला उमेदवार रात्रीतून निर्णय फिरवीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये सध्या पंतप्रमुखांची तारांबळ उडत आहे.


बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येकवेळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावामध्ये चुरस असायची. ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लढविण्यासाठी लोकांमध्ये उत्साह असायचा. यावेळी मात्र सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सदस्य निवडीसाठी लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही.





नसल्याचे चित्र आहे. सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने असे सरपंच पुढची पाच वर्षे एकहाती कारभार हाकणार हे स्पष्ट आहे. या सरपंचांना दीर्घकाळ अविश्वासापासून देखील संरक्षण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश सदस्य केवळ 'सह्याजीराव ठरणार आहेत. मग असल्या नामधारी पदासाठी खर्च करायचा कशाला आणि गावात अनेकांचा रोष घ्यायचा कशाला अशी मानसिकता वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांमधून सदस्य पदासाठी उमेदवार शोधताना सरपंचपदाच्या उमेदवारांची किंवा पॅनल प्रमुखांची तारांबळ उडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.