विधिज्ञ शत्रुघ्न गर्जे यांची गळफास घेऊन आत्महत्या

 विधिज्ञ शत्रुघ्न गर्जे यांची गळफास घेऊन आत्महत्या



आष्टी / संदीप जाधव  - आष्टी येथील न्यायालयातील विधिज्ञ शत्रुघ्न गर्जे (वय ३२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि.27 रोजी सकाळी 6 च्या सुमारास समोर आली आहे.






शत्रुघ्न गर्जे मागील काही वर्षांपासून आष्टीच्या न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे कापसी येथील रहिवाशी असून आज सकाळी 6 च्या सुमारास गहीनीनाथगडावर जाणाऱ्या डोंगरातील रस्त्यालगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र परिसरात त्यांचा मृत्यु संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. आष्टी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.मृतदेहाचे शवविच्छेदन धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर कापसी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.