*सौ . कमलबाई काकासाहेब कर्डिले उतरणार निवडणुकीच्या रिंगणात*
--------------
कडा/अनिल मोरे
आष्टी तालुक्यातील 109 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला असून प्रत्येक जन आपापल्या परीने कामाला लागले असून कडा शहरामध्ये सरपंच पद हे सर्वसाधारण महीलेसाठी राखीव आहे.
यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हिरीरीने भाग घेत असून प्रत्येक जन आपापल्या नेत्याच्या मागे फिरत आहेत.
यामध्ये आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे,माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या प्राणप्रतिष्ठेची समजली जाणारी कडा ग्रामपंचायत निवडणूक आहे.
त्यातच यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आष्टी तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे यांचा पॅनलही या निवडणुकीमध्ये टाकला जाणार असून काॅग्रेस पक्षाच्या वतीने काकासाहेब कर्डिले यांच्या पत्नी कमलबाई ह्या सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत.
त्यामध्येच कडा शहरातील वेगवेगळ्या पक्षातील पुढारी प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार शोधण्यास व्यस्थ आहेत.
कडा ग्रामपंचायत सरपंच पदाची नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार काकासाहेब कर्डिले यांनी साबलखेड ते चिंचपूर या रस्त्याच्या कामासाठी कडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला होता.
त्याचबरोबर मागील दिवसामध्ये अती पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये त्या नुकसान ग्रस्थांना भरपाई द्यावी म्हणून बोंबमारो आंदोलन करण्यात आले होते.
कोरोना काळात गोरगरीब कुटुंबाला अडचणीच्या काळात आधार देण्याचे कामही केले होते.
संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना या व अशा अनेक योजना गोरगरीबांपर्यंत पोहचवण्याचे कामही त्यांनी प्रामाणिकपणे केले.
सरपंचपदी निवडून आल्यानंतर कडा गावचा विकास झाला पाहिजे याच उद्देशाने मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याची माहिती काकासाहेब कर्डिले यांनी दिली आहे.
stay connected