*लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत चालू करा नसता अधिकाऱ्यांचे पाय धुणार:- राजु म्हस्के*
---------------------------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील शेरी बु गेल्या तीन महिन्यापासून अंधारात असून अर्ध्या गावात साम्राज्य पसरले आहे याबाबत अनेक वेळा महावितरण कार्यालयात अधिकारयांना विनंती केली परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे उद्योग व्यवसायाबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न , पिठाच्या गिरणी , मुलाच्या अभ्यास यावर मोठा परिणाम झाला आहे परिणामी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गावातील जनता मात्र हैराण झाली आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या साहेब आता तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आष्टीचे कर्तव्य दक्ष नायब तहसिलदार शारदा ताई दळवी यांना निवेदनाद्वारे केली अशी मागणी शिवसंग्राम चे राजू म्हस्के यांनी केली .
आष्टी तालुक्यातील शेरी हे गाव कडा विद्युत उपकेंद्रात येत असून गेल्या एक महिन्यापासून शेरी बु येथील सोनवणे वस्ती , महाडिक वस्ती, झोपडपट्टी , हा भाग रोहित्र जळून गेल्याने अंधारात आहे त्यामुळे डासांमुळे होणारे आजार , मलेरिया, डेंगू, हिवताप, असे अनेक रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत आतापर्यंत एका महिन्यात पाच वेळेस लोकवर्गणीतून रोहित्र बीड येथून बदलून आणले परंतु दरवेळी वीज रोहित्र बदलुन आणले की , एक दिवसात फार झाले तर चार ते पाच दिवसात ते पुन्हा नादुरुस्त होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत त्यामुळे आता तरी दोन दिवसात पूर्णपणे दुरुस्त असलेले 25 केव्ही तीन डब्बे देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा नसता शिवसंग्राम च्या वतीने लोकशाही मार्गाने महावितरण अधिकारी यांचे पाय धुणे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शिवसंग्राम चे राजू म्हस्के यांनी दिली आहे.
stay connected