पत्रकार बातमीतून सर्वांचा गुणगौरव सत्कार करतात, त्यांचाही व्हायला पाहिजे ............ किशोर हंबर्डे
आष्टी प्रतिनिधी
वर्तमानपत्राचा तिसरा डोळा जगातल्या चांगल्या वाईट घटना प्रसंगाकडे कटाक्ष ठेवतो.त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. चांगल्या कामाची कुणीतरी दखल घ्यावी असेही प्रसंगी वाटते.कधी अन्यायावर त्याची वेदना अधोरेखित व्हावी असेही वाटते. बातमीदार,पत्रकाराच्या माध्यमातून दत्त म्हणून उभा राहतात.जगापुढे त्याची बातमी दृक.श्राव्य माध्यमातून झळकते.कौतुकाची थाप मनाला हुरळून टाकते.त्याचा केंद्रबिंदू असते बातमी.पत्रकार बातमीतून सर्वांचा गुणगौरव सत्कार करताना, त्यांचाही व्हायला पाहिजे. मागे दर्पण दिनाच्या निमित्ताने त्यांचा हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनचे कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्यावतीने पाच पत्रकारांचा सन्मानपूर्वक गुणगौरव सत्कार सन्मान करण्यात आला होता.आणि आता सुनील पोपळे,उत्तम बोडखे,अनिरुद्ध धर्माधिकारी,अविनाश कदम,सय्यद बबलू, संतोष सानप,प्रवीण पोकळे या पत्रकारांचा गुणगौरव सत्कार होतो आहे.आम्ही ही परंपरा पुढे चालू ठेवू.असे किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय,भाऊ फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी रक्तदान,वृक्षारोपण,अनाथालयात अन्नदान असे विविध उपक्रम राबवले गेले.सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,डॉ.रवी सातभाई,डॉ.अभय शिंदे,कार्यालय अधीक्षिका सरस्वती जाधव,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,यांनी परिश्रम घेतले.
stay connected