आरोप बिनबुडाचे व राजकिय द्वेषातून , कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज - आमदार सुरेश धस

 आरोप बिनबुडाचे व राजकिय द्वेषातून , कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज - आमदार सुरेश धस 

-------------------------------


आमदार सुरेश धस यांच्यावर झालेल्या गुन्हृयासंदर्भात आज दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आष्टी येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन प्रकरणी नुकताच आमदार सुरेश धस याच्यासह पत्नी व भाऊ याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.या देवस्थान इनामी जमीन प्रकरणी माझा व माझ्या कुटुंबाच्या नावावर नसुन हे षडयंत्र असल्याचा आरोप असून,आपल्यावर झालेल्या गुन्ह्यांत पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी येथे सांगितले.

आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्या प्रकरणी बुधवारी आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी व भाऊ यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले की,देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील जमीनी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत,निराधार तक्रारातील वाक्य रचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत.मी जुन्या पक्षात काम करत असताना राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र असुन पोलिसांच्या चौकशीला मी तयार असुन त्यांना सहकार्य करणार आहे.लवकरच दुध का दुध व पाणी का पाणी होणार आहे.लोकसेवका विरोधात तक्रार आली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते.पण तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. जर अस घडत असेल तर कोणत्याही लोकसेवकावर असे अस्त्र वापरले जाईल असेही त्यांनी सांगीतले.यामध्ये बदनामी करण्यापलीकडे काही नाही.

मी ही जमीन निकाळजे कुटुंबाकडून रितसर खरेदी करुन प्लाॅटींग करून विक्री केली आहे.

मच्छिंद्रनाथ ट्रस्टवर मी २००७सालापासून विश्वस्त म्हणून काम करत आहे.

मी एकटाच नसून दहा ते बारा जन काम करत आहेत.

माझी सर्व मालमत्ता व माझ्यावर असलेले कर्ज हे माझ्या प्राॅपर्टी पेक्षा जास्त असल्याचे मत आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.





तेजवार्ता प्रतिनिधी संदिप जाधव आष्टी बीड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.