*कडा ग्रामपंचायत ही विधानसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरणारी राहील..!*
-------------------------------------
ग्राम पंचायत 2022
संदिप जाधव/आष्टी
आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायत ही उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरणारी राहील.
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी असणारी कडा ग्रामपंचायत असून ही एकुण १७ सदस्य व एक १८ वा सरपंच अशी असणारी कडा ग्रामपंचायत आहे. ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरणारी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आजतागायत बीड उस्मानाबाद लातूर जिल्ह्याचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे.
परंतु आता गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रत्येक जण निवडणुक लढण्यासाठी आप -आपल्या परीने निवडण्याच्या रिंगणात उतरताना आपल्याला दिसत आहे.
यामध्ये आमदार सुरेश धस,माजी आमदार भिमराव धोंडे त्याचबरोबर आमदार बाळासाहेब आजबे हे सुद्धा कडा ग्रामपंचायत आप आपल्या परीने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या निवडणुकीत जो चांगल्या प्रकारे जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर आहे अशांनाच सेवा करण्याची जनता संधी देणार आहे.
बाकीच्यांना जनता घरचा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
म्हणून प्रत्येक नेते मंडळी जनतेला विश्वासात घेऊन जनतेच्या मनावर ताबा मिळवण्याची धडपड करताना आपणांस पाहावयास मिळत आहे.
परंतु जनता हीच सर्वांची मालक आहे.जनता कोणाचीही गुलाम नसुन येणाऱ्या काळात कडा ग्रामपंचायतवर नेमके कोणाचे वर्चस्व राहणार हे जनताच ठरवणार आहे.
आष्टी तालुक्यामध्ये छोटे मोठे पक्षाचे ही मते निर्णायक ठरणार आहेत.यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,आम आदमी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचीत बहुजन आघाडी, शिवसंग्राम,शेतकरी कामगार पक्ष,त्याचबरोबर ऑल इंडिया पॅंथर सेना या सर्व संघटना एकत्र आल्या तर सत्ताधाऱ्यांना हादरा बसू शकत आहे.
परंतु येणाऱ्या काळामध्ये या छोट्या मोठ्या संघटनांना सत्ताधारी पक्ष विश्वासात घेणार आहेत की नाही यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.
नेमकी कडा ग्रामपंचायत ही कोणाच्या ताब्यात जाईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


stay connected