शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्या उपस्थितीत विज पुरवठा खंडीत केल्याप्रकरणी टाकळी ग्रामस्थांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव..
------------------------------------
आष्टी तालुक्यातील टाकळी अमीया या गावचा गेल्या चार पाच दिवसांपासून विज पुरवठा खंडीत केला होता.
परंतू खंडीत केलेला विज पुरवठा पुन्हा सुरळीत करावा या मागणीसाठी टाकळी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्याला घेराव घालुन जाब विचारला.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील सर्व गावांचा विज पुरवठा सुरळीत आहे परंतु टाकळी गावचा विज पुरवठा खंडीत केला आहे.वारंवार विनंती करूनही सुरळीत न केल्याने गावकऱ्यांचा सहनशीलतेचा बांध तुटला व गावकऱ्यांनी चक्क अधिकार्याला घेराव घालुन जाब विचारला.
यावेळी विज वितरणचे अधिकारी धसपुते यांनी गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगितले की,आज बारा वाजेपर्यंत विज पुरवठा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी गावकऱ्यांनी आरोप केला आहे की,जामगांवची लाईट आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मुळे बंद होऊ शकत नाही.
शिराळची लाईट आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मुळे बंद होऊ शकत नाही.
पिंपळा गावची लाईट माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांच्यामुळे बंद होऊ शकत नाही.
परंतु टाकळी गावाला मोठा नेता नसल्यामुळे बंद होते का असा संतप्त सवाल समस्थ गावकऱ्यांनी केला आहे.
गावकऱ्यांचा आक्रोश पाहुन अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी शिवसंग्रामचे आष्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, डॉ शिवाजीराव शेंडगे,प्रा राम बोडखे , सरपंच सावता ससाणे ,अशोक चौधरी, संकेत चौधरी,चेअरमण हजारे, श्रीरंग चौधरी, अमोल चौधरी, संतोष चौधरी, अमोल शितोळे, ज्ञानेश्वर शितोळे,पवण चौधरी अशोक एकशिंगे,बंटी काकडे,दत्ता चौधरी, अमोल भुक्कन तात्यासाहेब नालकोल, विशाल साबळे सह रुई,टाकळी सराटेवडगांव, आनंदवाडी चोभानिमगांव सह आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
तेजवार्ता प्रतिनिधी संदिप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडा आष्टी
stay connected