आ.आजबे यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना शुक्रवार पर्यंत 7 ऐवजी 5 हजार रु वीज बिल भरण्यास मुदत वाढ उपअभियंता पवार यांची माहिती

 आ.आजबे यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना शुक्रवार पर्यंत 7 ऐवजी 5 हजार रु वीज बिल भरण्यास मुदत वाढ
 उपअभियंता पवार यांची माहिती 



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यामध्ये सध्या कृषी पंपाचे वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तोडण्यासाठी महावितरण कडून मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी शेतकऱ्यांनी आमदार आजबे काका यांच्याकडे विनंती करून वीज बिल 7000 ऐवजी 5000 करावे व विज बिल भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती त्यास आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी महावितरणचे उपअभियंता प्रवीण पवार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना शुक्रवार पर्यंत सरसकट कनेक्शन साठी पाच हजार रुपये भरून घेण्यास मुदत द्यावी असे सांगितले त्यास उपाभियंता प्रवीण पवार यांनी होकार दर्शवत शुक्रवार पर्यंत शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रत्येकी कनेक्शन भरण्यास मुदत वाढ दिली आहे .

       सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले की यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने पाणीसाठा मोफत आहे त्यामुळे महावितरण कडून शेतकऱ्यांना उच्च दाबाने दिलेल्या वेळेत विद्युत पुरवठा झाला पाहिजे शेतकऱ्यांकडून प्रती कनेक्शन सात ऐवजी पाच हजार रुपये भरून घ्यावेत व शुक्रवार पर्यंत कुठल्याही  डीपीचे कनेक्शन तोडू नयेत परंतु शुक्रवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ही आपल्याकडील पाच हजार रुपये वीज बिल भरून घ्यावे व महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन आ. आजबे यांनी  केले आहे, यावेळी बोलताना उपअभियंता पवार म्हणाले की आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व त्यांनी सांगितल्यानुसार आपण शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून घ्यावेत म्हणजे कोणत्याही डीपीवरील कनेक्शन तोडले जाणार नाही परंतु शुक्रवार नंतर पैसे भरले नाहीत तर त्यानंतर मात्र सरसकट वीज कनेक्शन कट करण्यात येतील असेही यावेळी उपअभियंता प्रवीण पवार यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.