सक्तीची वसुली आ.धस यांच्या मध्यस्थीने थांबली शेतकऱ्यांनी मानले धस यांचे आभार

 सक्तीची वसुली आ.धस यांच्या मध्यस्थीने थांबली शेतकऱ्यांनी मानले धस यांचे आभार



आष्टी प्रतिनिधी 

महावितरण कार्यालयाने दिवळीपासून सक्तीची वीज बील वसुली तसेच वीज तोडणी मोहीम हाती घेतली होती.मात्र आ.सुरेश धस यांच्या सूचनेवरून महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.पवार यांनी ही सक्तीची वसुली आणि वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवत प्रत्येक कृषी पंप ग्राहकाकडून प्रत्येकी ५ हजार रुपये रक्कम या आठवड्यात भरून घेत वीज सेवा अविरत सुरू ठेवण्याचे सांगितल्यानंतर आ.धस यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

सध्या शेतात गहू,ज्वारी,कांदा,हरभरा यासह अन्य पिके चांगल्या अवस्थेत असताना वीज पुरवठा खंडित होत असल्याने ती पिके नियमित पाणी अभावी वाया जाण्याची भीती असल्याने यावर आपण काहीतरी तोडगा काढण्याची विनंती शेतकऱ्यांनी आ.धस यांचेकडे केली होती.याच पार्शवभूमीवर आ.धस यांनी आष्टी महावितरणचे कार्यकारी अभियंता पवार यांच्याशी दूरध्वीवरून संपर्क साधत यावर उपाय म्हणून सक्तीची वसुली आणि वीज तोडणी थाबवण्यासाठी ठोस उपाय म्हणून प्रत्येक वीज ग्राहकाकडून 5 हजार रुपये प्रमाणे भरणा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे सांगितल्यानंतर पवार यांनी ही सूचना तात्काळ अमलात आणत या आठवड्यात हा भरणा करून अविरत वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आ.धस यांच्या मध्यस्थीने विजेचा प्रश्न मार्गी लागल्याने आ.धस यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.