जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा..
केज :- तालुक्यातील धनेगाव कॅम्प येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल येथे आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,१४ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्याबरोबरच पंडित नेहरू यांच्या जयंतनिमित्त साजरा करण्यात येणारा बालदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उत्तम खोडसे,ज्ञानेश्वर खोडसे होते.कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.शाळेतील मुलांना डॉ खोडसे यांच्या वतीने बालदिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी डॉ उत्तम खोडसे,ज्ञानेश्वर खोडसे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले, निवेदिता मॅडम,प्रियांका मॅडम व इतर उपस्थित होते.
stay connected