डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी खुलविलेनिराधार बालांच्या चेह-यावर हास्य
आम्रपाली धेंडे
पुणे:8 :नोव्हेंबर 2022
परिवारातर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी निराधार महिलांसाठी
कार्य करणा-या अक्षरस्पर्श, जांभूळवाडी-पुणे संस्थेला कपडे भेट दिले.तसेच निराधार बालांसाठी ' बे दुणे चकली ' कार्यक्रम करुन गोड बोलणा-या बालांना 'मिठू मिठू पोपट'
ॲवार्ड तर हस-या बालांना लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्ड दिले. अक्षरस्पर्श संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष दीपाली निखळ होत्या.युवा कार्यकर्ते जयंत हिरे, हेमंत वांबुरे, सौ.रुपाली वांबुरे आदि मान्यवर उपस्थित होते .जयंत
हिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.पुणे शहरापासून दूर डोंगराळ भागात असलेल्या संस्थेतील निराधार
बालांच्या - महिलांच्या चेह-यावर
ज्येष्ठ कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर
सहजरित्या जेव्हा हास्य खुलतात
तेव्हा ख-या अर्थाने अक्षरस्पर्श संस्थेला दिलासा मिळतो असे दीपाली
निखळ यांनी सांगितले .
stay connected