सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसला जाण्यासाठी शहरातून व्यवस्था सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन

 सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसला जाण्यासाठी शहरातून व्यवस्था
सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन 


अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसची अजमेर (राजस्थान) येथे मोठ्या उत्साहात तयारी सुरु असून, अहमदनगर शहरातून मोठ्या संख्येने भाविक या उरुसमध्ये सहभागी होणार आहे. भाविकांना अजमेरला जाण्यासाठी रेल्वे अथवा खासगी वाहनांची पुरेशी सुविधा नसल्याने शहरातून विशेष खासगी लक्झरी बसने जाण्यासाठी सात दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन समन्वयक फजल शेख, मोहसीन मिर्जा व नदिम शेख यांनी केले आहे.

ख्वाजा गरीब नवाज यांचा 811 वा उरुस म्हणजेच छट्टी शरीफ रविवार 29 जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. या उरुस मध्ये सहभागी होण्यासाठी नगरमधील नागरिकांना जाणे, येणे, निवास, भोजनची व्यवस्था अल्पखर्चात सेवाभावाने करण्यात आलेली आहे. प्रथम नोंदणी करणार्‍यांना प्राधान्य राहणार असल्याने अधिक माहिती व नोंदणीसाठी या नंबरवर 8087742818 व 7249314722 संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.