आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल
आष्टी प्रतिनिधी -
देवस्थान जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंगळवारी गुन्हा रात्री आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रामदास सूर्यभान खाडे (रा. करेवाडी ता. आष्टी जि. बीड) आरोपी आ. सुरेश रामचंद्र धस, प्राजक्ता सुरेश धस, मनोज रत्नपारखी, देविदास रामचंद्र धस, अस्लम नवाब खान यांच्यासह इतरांवर 29 नोव्हेंबर रोजी बीड गु.र.नं. 386/2022 कलम 13 (1) (अ) (ब), 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सह कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (ब)109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
.
stay connected