*प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके राष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार निमित्त सत्कार*
आम्रपाली साबळे धेंडे
चिखली येथे राऊत वाडी येथे १३ नोव्हेंबर २०२२ ला प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके यांना पुणे उरळी कांचन येथील डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट कडून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम त्याचा सत्कार करण्यात आला.शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन चे वतीने आयोजन करण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशन संस्थापक डॉ शिवचरण उज्जैनकर सर , महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉ श्रीकांत पाटील कोल्हापूर, हे चिखली येथे येवून त्यांना त्यांच्या सात्विक आणि राष्ट्रात व समाज हिताच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. शेळके यांचे अभिनंदन सत्कार सोहळ्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.श्रीकांत पाटील म्हणाले की,पुण्यातील मणिभाई ट्रस्ट बाबत मला जाणीव आहे.सत कार्य आणि तळमळीच्या सेवकाची दखल घेवून सदर ट्रस्ट सन्मान करतो. प्राचार्य डॉ शेळके यांचा हा त्यागमय व तळमळीने केलेल्या सेवकर्याचा सन्मान आहे. आम्ही उज्जनकर फाउंडेशन मनापासुन पुरस्काराचा सन्मान करून मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करीत आहोत .यावेळी उज्जैनकर फाऊंडेशन चे संस्थापक डॉ शिवचरण उज्जैनकर हस्ते सत्कार करण्यात आला. फाऊंडेशन सचिव प्रमोद पिवळे, औरंगाबाद समन्वयक अड.सर्जेराव साळवे,कोल्हापूरचे वारणा.बँक ज्येष्ठ संचालक धोंडीराम सीद,परशराम आंबी सर,व श्री गणेश पाटील
बुलडाणा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष मनोहर पवार, सा.कार्यकर्ते निवृती जाधव ,मुख्याध्यापक प्रदीप मोरे इंजिनियर विशाल बुरकुल प्राचार्य दिनकर झनक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अड सर्जेराव साळवे यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर पवार यांनी केले.
stay connected