महापुरुषाबद्दल अपशब्द
वापरल्याप्रकरणी राज्यपाल यांची हकालपट्टी करण्यात यावी... रवी काका ढोबळे
---------------------------
कडा/अनिल मोरे.
महापुरुषाबद्दल राज्यपाल यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांची हकलपट्टी करा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले याच्या विषयी प्रत्येक वेळी अप शब्द वापरले जातात . ते हे विसरले आहेत की ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत . त्यानी अशे महापुरुषा विषयी आपल्या प्रत्येक भाषणात महापुरुषाचा अवमान केला जात आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यातुन नाही तर देशातुन त्यांची हाकालपट्टी करा .ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. संभाजी राजे यांनी औरंगजेब विरुद्ध लढा दिला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी श्रींचा आदर केला व स्त्रियांना शिक्षणाचे धडे दिले अशा महापुरुषाविरुद्ध राज्यपाल यांनी अपशब्द वापरणे बरोबर नाही अशा या देशद्रोही राज्यपाल यांना महाराष्ट्र राज्यातून नव्हे तर भारत देशातून यांची हकालपट्टी करण्यात यावी जो कोणी महापुरुषाबद्दल अपशब्द वापरले त्याला फासावर लटकल्याशिवाय राहणार नाही.
अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे रवी काका ढोबळे यांनी केली आहे.

stay connected