*बीड जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश खंडीत विजपूरवठ्याचे प्रतीतास पन्नास रूपये द्यावे- शेख अजिमोद्दीन**शेतकरी संघटनेचा महावितरण ला झटका*
👉महावितरण कंपनीने कृषीपंपाचे विजबील वसूलीच्या नावाखाली घरगूती वीज ग्राहकांना देखील वेठीस धरले व पिंम्पळा,ता.आष्टी,सबस्टेशनमधून मनमानीपणे विजपूरवठा खंडीत करण्यात येऊ लागला. याबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी सबस्टेशन मध्ये चौकशी केली त्यावेळी तेथील कर्मचारी यांनी आम्हाला वरून तोंडी आदेश आहेत व स्थानिक पातळीवर आम्हाला भारनियमन करता येते असे सांगितले त्यांना लेखी तक्रारीची पोहच मागीतली असता आम्ही देऊ शकत नाही तूमची तक्रार धानोरा येथे करा असे सांगितले.सबस्टेशन मधील दैनंदिनी नोंदवही ची फोटोकापी ही देण्यासाठी नकार दिला.धानोरा येथे वांरवार भेट देऊनही सहाय्यक अभियंता भेटू शकले नाही म्हणून शेवटी उप कार्यकारी अभियंता आष्टी यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली परंतु कार्यवाही झाली नाही. असे तीन अर्ज करण्यात आले व शेवटी बीड जिल्हा ग्राहक मंच मध्ये ०१एप्रील २०२२ रोजी तक्रार दाखलकरण्यात आली.त्यामध्ये ०३/०१/२०२२ते १५/०१/२०२२पर्यंत शनीवार रविवारी वगळता सकाळी ६ वा.ते रात्रीं ११वाजेपर्यंत विजपुरवठा खंडीत होता आणि १६/०१/२२ ते २७/०१/२२ शनीवार रविवार वगळता सकाळी ६वा.ते सांय.६ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता.या दरम्यान शनिवार रविवार पूर्णपणे विज पुरवठा खंडित होता.तसेच तक्रारदारास नियमीतपणे व पूर्ण क्षमतेने विजपुरवठा केला नाही म्हणून तक्रारदारास प्रती तास ५०/-रूपये तासाने नूकसनभरपाई व झालेल्या त्रासापोटी व खर्चापोटी ५०००(पाच हजार)रूपये देण्यात यावे म्हणून ग्राहक मंच मध्ये मागणी केली. सूनावनी सूरू झाल्यावर तक्रारदार शेख यांचे वकिल यूक्तीवादासाठी हजर राहू शकले नाही म्हणून मंचासमोर तक्रारदार शेख अजिमोद्दीन यांनी आपली बाजू सक्षमपणे स्वतः मांडली व अधिकचे सबळ पुरावे सादर केले.महावितरण वकीलाचे म्हणने शेख यांनी मंचासमोर खोडून काढले .
सदर प्रकरण जिल्हा तक्रार निवारण आयोग अध्यक्ष श्री.श्रीधर कूलकर्णी,सदस्य श्रीमती अर्पणा दिक्षीत व सदस्य श्रीमती मेघा गरूड यांचे समक्ष झाले. श्रीमती मेघा गरूड सदस्या यांचे द्वारे निकाल घोषित करण्यात आला.
निकाल पूढीलप्रमाणे १) तक्रार अर्ज मंजूर करण्यात आला.२)तक्रारदार ३२८ तासाचे प्रती तास पन्नास रूपयेप्रमाणे १६,४०० (सोळा हजार चारशे)रूपये नूकसांन भरपाई आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून तीस दिवसात देण्यात यावी.३)तक्रारदार नियमाप्रमाणे अखंडीत व योग्यक्षमतने वीज पूरवठा सूरू ठेवावा.४)तक्रारदारास मानसीक व अर्थीक त्रासापोटी ३०००रूपये व तक्रारीचा खर्च २०००रूपये द्यावा.५)ग्राहक संरक्षण कायदा २०१९चे कलम२०(३)प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रार दारारास परत करावे
असे आदेश दिनांक ९/११/२०२२रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बीड यांनी पारीत केले आहेत. धानोरा येथील सहायक अभियंता चंदन पांडे व कार्यकारी अभियंता बीड यांच्या विरूद्ध हा दावा शेतकरी संघटनेचे शेख अजिमोद्दीन यांनी दाखल केला होता.
पिंम्पळा सबस्टेशनच्या मनमानीला आता तरी लगाम बसेल असे वाटते. बीड जिल्ह्यातील वीज ग्राहकांनीही आपला विजपूरवठा कूठलीही पूर्व सूचना ने देता सबस्टेशन कर्मचारी अथवा वायरमन बंद करत असेल तर आपणही प्रतीतास नूकसान भरपाई मागू शकता रोहीत्रापासून वीज बील वसूली साठी पूरवठा खंडीत करता येत नाही तरी शेतकऱ्यांनी नूकसान भरपाई आवश्यक मागावी सर्वोतोपरी माहीती व सहकार्य शेतकरी संघटना आपणास करेल.तरी शेतकऱ्यांनी व घरगूती वीज ग्राहकांनी प्रतीतास ५०/-रूपये नूकसान भरपाई मागावी असे आव्हान शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी केले आहे.


stay connected