*पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रा.लक्ष्मण नवले यांना भरघोस मतांनी विजयी करा:- ज्ञानेश्वर चौधरी*

 *पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रा.लक्ष्मण नवले यांना भरघोस मतांनी विजयी करा:- ज्ञानेश्वर चौधरी*

-----------------------------------


आष्टी/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच काम त्यांनी केलेल आहे व करीत आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 च्या निवडणुक लढवीत असून लक्ष्मण नवले यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका मांडत आहेत सिनेट निवडणूकीसाठी एकूण दहा जागेपैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून यासाठी प्रा.खंदारे सर यांच्या परिवर्तन पॅनल मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल मधून खुल्या प्रवर्गातून प्रा. लक्ष्मण उत्तम नवले यांनी खुल्या वर्गातून निवडणूक लढवीत आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांसाठी न्याय भूमिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शिवसंग्राम चे उमेदवार प्रा. लक्ष्मण उत्तम नवले ही निवडणूक लढवीत आहेत. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थिती त्यांच्या अडीअडचणी बाबतीत नेहमी सदैव तत्पर असून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले.

 स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे हित बघितले आहे . त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रा.लक्ष्मण उत्तमराव नवले यांना पहिल्या पसंतीचे मतदान देऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आव्हान आष्टी चे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.