किशोर नाना हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पोपळे,बोडखे,धर्माधिकारी,कदम,सय्यद, सानप,पोकळे या सात पत्रकारांचा गौरवपूर्ण सत्कार होणार

 किशोर नाना हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पोपळे,बोडखे,धर्माधिकारी,कदम, सय्यद, सानप, पोकळे या सात पत्रकारांचा गौरवपूर्ण सत्कार  होणार                             

      .....................................................................

आष्टी प्रतिनिधी-  संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुनील पोपळे, उत्तम बोडखे,अनिरुद्ध धर्माधिकारी,अविनाश कदम,सय्यद बबलू, संतोष सानप,प्रवीण पोकळे या सात पत्रकारांचा सन्मानपूर्वक गौरव सत्कार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय, आष्टी, जिल्हा बीड येथे होणार आहे. असे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,आष्टी जि.बीड यांच्या वतीने याच वर्षातील दर्पण दिनानिमित्त संतोष दाणी,राजेंद्र लाड,बा.मा.पवार,जावेद पठाण,शरद तळेकर या पाच पत्रकारांचा भव्य असा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता.दर्पण दिनाची परंपरा कायम ठेवून,संस्थाध्यक्ष किशोर नानांच्या वाढदिवसानिमित्त या सात पत्रकारांच्या गौरवपूर्ण सत्काराची परंपरा नव्याने पुढे येत आहे.या आणि रक्तदान, अनाथालयात अन्नदान, वृक्षारोपण आणखी काही उपक्रमांसाठी सचिव अतुल शेठ मेहेर, दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,सर्व सन्माननीय संचालक,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे, प्रा.डॉ.रवी सातभाई, कार्यालयीन अधिक्षिका सरस्वती जाधव,भाऊ फाउंडेशनचे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,यांच्या सोबतच सर्व प्राध्यापक,कर्मचारी परिश्रम येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.