वाजपेयींची कविता कुठल्याही काळाशी साधर्म्य साधणारी
--- सर डाॅ.मधुसूदन घाणेकर
आम्रपाली साबळे धेंडे
पुणे:9 नोव्हेंबर 2022 :
" श्रध्देय स्व.अटल बिहारी यांची कविता प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीची
होती.राष्ट्रहित प्रथम हाच त्यांच्या कवितेचा आत्मा होता.त्यांच्या प्रतिभेतून मुळातच शाश्वत लेखनाची
क्षमता होती,त्यामुळे त्यांची कविता ही
कुठल्याही काळाशी साधर्म्य ठरणारी आहे " असे प्रतिपादन पहिल्या विश्वकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि भारतीय
जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे
सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
भा.ज.पा.पुणे शहर सांस्कृतिक विभागातर्फे नुकताच ज्येष्ठ कवी आणि माजी आमदार विश्वास गांगुर्डे
यांना ' भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी स्मृति काव्य पुरस्कार '
प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सर डाॅ.मधुसूदन घाणेकर सांस्कृतिक विभागाची भूमिका विषद करताना बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उच्च आदर्शवादांचे प्रबोधन करण्याची क्षमता प्रतिभावंतांमधे असते आणि यातूनच राष्ट्रविकास घडत असतो असेही डाॅ.घाणेकर सरांनी आपल्या भाषणात सांगितले .भा.ज.पा.ज्येष्ठ नागरिक आघाडीचे सरचिटणीस पोपटराव गायकवाड यांच्या शुभहस्ते विश्वास गांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष मदन डांगी होते.सांस्कृतिक विभागाच्या सचिव
प्रिया प्रमोद दामले यांनी सूत्रसंचालन केले. सारिका सासवडे आणि रवि सरनाईक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.कवी वि.ग.सातपुते यांनी आभार
मानले.ज्येष्ठ नागरिक आघाडीचे
श्रीनिवास तेलंग, सतीश मुळे, सुभाष
वाड्ये, विकास कुलकर्णी, तुळशीराम उणेचा, विजय दीक्षित आदि मान्यवर
उपस्थित होते. प्रारंभी यशवंत गरड
यांनी गिटार वादन सादर केले.
सोनी गोडसे यांनी ईशस्तवन सादर केले.बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर
पाचपोर यांनी वाजपेयी यांचे एक गीत
सादर केले.वाजपेयींच्या नावाने पुरस्कार हा माझ्या दैवताला पुरस्कार
आहे, असे विश्वास गांगुर्डे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
मदन डांगी, पोपटराव गायकवाड, अशोक भांबुरे, विजय सातपुते आदिंची याप्रसंगी भाषणे झाली.
डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांकही याप्रसंगी प्रकाशित करण्यात आला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
stay connected