ग्रामपंचायत निवडणूकाचे डफडे वाजू लागले .जिह्यातील 704 ग्रा.पं. निवडणूक कार्यक्रम जाहीर
आष्टी ( संदीप जाधव ) : आज दि . 9 नोव्हेबर रोजी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला . ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले असुन आता गावोगावचे निद्रीस्त कार्यकर्ते बाह्या सावरून खडबडून जागे झाले आहेत . ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. यात बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतचा समावेश आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 18 डिसेंम्बर 2022 रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यात सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायती असून यात बीड जिल्ह्यातील सुमारे सातशे चार ग्रामपंचायतचा समावेश आहे. या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते.. अखेर आज निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. गावोगावी इच्छूक उमेदवार पॅनल प्रमुख अंग झटकून जागे झाले आहेत . आष्टी तालुक्यातही ग्रामपंचायत इच्छूक यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आष्टी तालुक्यातील महत्वाच्या धानोरा , कडा , धामणगाव सारख्या ग्रामपंचायतींची निवडणूक तालुक्याच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असते .
राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर. २८ नोव्हेंबरपासून उमेवारी अर्ज. १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी. सरपंचाची होणार जनतेतून थेट निवड.
stay connected