लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील
निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे *स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती "बाल दिन" संपन्न
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे, आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून संपन्न करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील बालकांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इयत्ता पाचवीतील मुलीने श्रीफळ अर्पण केले. याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री संजय कदम सर यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याला उजाळा देऊन बालका विषयी त्यांच्या मनामध्ये असणारे प्रेम व जिव्हाळा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले........
stay connected