*राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा*
*लातूर, प्रतिनिधी चंद्रकांत पाटील :*
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर ह्या 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2022 या कालावधीत दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
श्रीमती चाकणकर यांचे 30 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता उस्मानाबाद येथून लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता श्रीमती चाकणकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक होईल. दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत राखीव. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार असून दुपारी चार वाजता मोटारीने धायरी, पुणेकडे प्रयाण करतील.
stay connected