गाय वाचली तर देश वाचेल - डॉ.मधुसूदन घाणेकर
आम्रपाली धेंडे
पुणे 17 नोव्हेंबर 2022 ...." या जगात हजारो गायीची उपासमार होत आहे . गायीची कत्तल होत आहे. कित्येक शेतकऱ्याकडे गाय नाही. गाईमुळे जीवन समृद्ध करण्यासाठी गाय वाचली पाहिजे. गाय वाचली तर देश वाचेल !"असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सांस्कृतिक शहर प्रमुख ,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हस्ताक्षर मनोविश्लेषण तज्ञ आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी, मधुरंग वकील साहेब, सेतुबंध न्यास, जनमित्र सेवा संघ, स्पेशल रिस्पॉलीबिलिटीज या संस्थेतर्फे हस्ताक्षर मनोविश्लेषणाच्या माध्यमातून 'गाय वाचवा: देश वाचवा'हे राष्ट्रीय जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. मधुसूदन घाणेकर बोलत होते. या एक दिवसाच्या अभियानात डॉ.मधुसूदन घाणेकर यांनी पुण्यात भेटेल त्याला' 'गाय वाचवा: देश वाचवा ' असे लिहायला सांगून सही वरून तत्काळ विनामूल्य सकारात्मक सही सभाव दर्शन घडवले . याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष मदन डांगी, कोषाध्यक्ष तुळशीराम उणेचा , सांस्कृतिक विभागाचे विलास दातार, अजित कुलकर्णी , स्वाती दिवाण , जनमित्र सेवा संघाचे कार्यवाह डॉ. दिलीप कुलकर्णी , विठ्ठल मुरकेवार, मधुरंगाच्या उपाध्यक्ष सारिका सासवडे , ज्येष्ठ साहित्यिक वंदना धर्माधिकारी , जयहिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नवले , छाया चित्रकार संजय केळकर , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ थिटे आदी मान्यवर उपस्थितीत होते . रवी सरनाईक आणि प्रिया दामले यांनी सदर सही यात्रेचे संयोजन केले. या यात्रेचे औचित्य साधून डॉ. मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांकही मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशित करण्यात आला .


stay connected