जि.प.मा.शाळा. टाकळसिंग १९९०/९० या एस.एस.सी.बॅच चा स्नेह मेळावा संपन्न.
सर्व माजी. विद्यार्थी व गुरुजन वर्ग यांचा दि.१३.११.२०२२ रोजी सस्नेहमेळवा मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून मोठया उत्सवात आनंदमय वातावरणात पार पडला. या साठी प्रामुख्याने संयोजन समिती ने नियोजित केलेला कार्यक्रम हा व्यवस्थीत पार पडला. त्या सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन.आलेल्या सर्व शिक्षकांचे पुष्प सुमने उधळून स्वागत केले.व या
कार्यक्रमचे सूत्र संचालन डाँ.शिवाजी राऊत(मा.जिल्हा परिषद अध्यक्ष. बीड) व आनंद मोरे, संदीप जोगदंड यांनी केले. तसेच कार्यक्रमचे अध्यक्ष.डी.जी.देशपांडेसर(मा.मुख्यधपक) यांना भुषवण्यात आले.त्यास बाबासाहेब लोंढे व आनंद मोरे यांनी अनुमोदन दिले.तसेच जे शिक्षक व विद्यार्थीयांचे निधन झाले आहे. त्यांना आदरांजली वाहिली. व त्या नंतर आलेल्या सर्व मान्यवर यांचे फटाक्यांची अतिषबाजीत भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. त्या नंतर सर्व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर आलेल्या सर्व शिक्षकाना सन्मानचिन्ह.शाल व पुष्पगुच्छ एकपेन. श्यामची आई हे पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तवना बद्रीनाथ जगताप(प.स.सभापती. आष्टी).यांनी मांडली. व डाँ. शिवाजी राऊत.डाँ. रवींद्र राजपुरे.डाँ. सुनील पठाडे.बिबीशन गावडे.बाबासाहेब लोंढे.अल्ताफ शेख. संदीप जोगदंड व सौ.रत्ना नेटके या सर्वांनी. आपली मनोगत व्यक्त केले.आलेल्या सर्व विध्यार्थी यांनी आपला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले.तसेच उपस्थित असलेल्या शिक्षकाने ही आपले परिचय व मनोगत व्यक्त केले. सर्वांनी शालेय जीवनातील गप्पा गोष्टी व हितगुज करून पुढील भावी विध्यार्थीना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात माजी विध्यार्थीनी ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम ची सांगता झाली. व त्यानंतरआनंद मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.व नंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.व कार्यक्रमचा समारोप केला.
stay connected