*अन्वी धोंडे हीचा 6 वा वाढदिवस नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करुन साजरा केला*
==============================================
आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील राजेंद्र अशोक धोंडे यांनी आपल्या मुलीचा सहावा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत व्यर्थ खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्रातील अनाथ, निराधार,गोरगरीब, वंचित विद्यार्थ्यांना मिठाई चे वाटप करुन आणि केक कापून साजरा केला.
वाढदिवस म्हटला की, प्रत्येकजण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात. परंतु नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजेंद्र अशोक धोंडे यांनी आपल्या मुलीचा सहावा वाढदिवस आष्टी शहरातील नवजीवन संगोपन केंद्रातील गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मदत व्हावी, फुल ना फुलाची पाकळी का होईना समजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून सामाजिक उपक्रमाने साजरा केला.यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई चे वाटप केले व केक कापून सर्व मुलांना आनंदाने खाऊ घातला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
यावेळी अन्वी चे आजोबा अशोक भैरू धोंडे बोलताना म्हणाले की म्हस्के मेजर आपण खूप छान करत आहात या सामाजिक कार्यात आमची जेंव्हा कधी गरज भासेल तेंव्हा हक्काने आम्हाला सांगा आम्ही ती नक्की पूर्ण करू.आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण या गोरगरीब मुलांना त्यांचे पालक होऊन त्यांचे दुःख वाटून घेऊन तसेच त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आनंदाने सांभाळता हे खूप चांगले आणि पुण्याचे कार्य आहे.आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
यावेळी नवजीवन संगोपन केंद्र आष्टी चे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर,संदीप धोंडे सर, राजेंद्र धोंडे, आर्यन धोंडे, संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected