महावितरण कंपनीने सक्तीची वसुली थांबवावी
....रवी काका ढोबळे.
कडा/अनिल मोरे.
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना सक्तीची वसुली थांबवावी .
शेतकऱ्यांनी प्रती पंप 5000रू भरु नये.
कारण यावर्षी पाऊस भरपुर झाला व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान व अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला सोयाबीन, मूग, उडीद व कांदा ही पिके पूर्णपणे वाया गेली असुन .
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना सक्तीची वसुली थांबवावी .
शेतकर्याना टप्याटप्याने हाप्ते पाडुन द्यावे .
नगर जिल्ह्यामध्ये प्रती पंप3000रू भरना असुन बीड जिल्ह्यामध्ये प्रती पंप 5000रू वीज भरना कशा मुळे असा सवाल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी केला आहे.
यावर्षी शेतकऱ्याना पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे ती त्याच्या शेतातली पिके हाताशी आले नाही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये वीज बिल भरून शकत नाही असे हे रवी काकांनी सांगितले आहे शेतकऱ्यांचा वाली कोणी नसल्यामुळे रवी काका यांनी पुढाकार घेऊन नगर जिल्ह्यामध्ये जे नियम आहेत तेच नियम बीड जिल्ह्याला लागू करावेत.
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.
शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई दिली नाही शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे विज बिल भरण्यासाठी पैसा नाही.
प्रत्येक शेतकऱ्याने 3000हजार रुपये एवढाच प्रति पंप भरणा करावा.
जर शेतकऱ्यांना वेठीस धरले तर. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाची महावितरण घेराव मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा ..रवि काका ढोबळे यांनी दिला आहे.
stay connected