आ.बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या " जन आक्रोश विराट मोर्चा " मोठ्या संख्येने उपस्थित रहा - सतिष शिंदे
■ शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या विविध मागण्यासाठी पाटोद्यात जन आक्रोश मोर्चा
■ आपला राष्ट्रवादी पक्ष सदैव शेतकरी हितासाठी दक्ष टॅगलाईन सुरू
पाटोदा / प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जनआक्रोश विराट मोर्चाचे महाविकास आघाडी व मित्र पक्ष आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याच्या वतीने दि.10 नोव्हेंबर 2022 वार गुरुवार सकाळी 10:30 वाजता पाटोदा येथे आयोजित करण्यात आले आहे, तरी या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सतिष आबा शिंदे यांनी केले आहे.
आलेलं संकट हे महाराष्ट्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांचे संकट वाढत असताना सरकारमधील 50 खोक्या वाले निवांत झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे महाविकास आघाडी व मित्र पक्ष नेहमीच हिताची निर्णय घेत आले आहे, परंतु 50 खोक्यांचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावला आहे. शेतकऱ्यांवर आलेलं ओल्या दुष्काळाचा संकट, विद्युत पुरवठा, इ.पी पाहणी, वीज कनेक्शन तोडणी, श्रावणबाळ, संजय गांधी योजनेतील रखडलेल्या फाईल इत्यादी विविध मागण्यासाठी महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्यावतीने आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी 10:30 वाजता जन आक्रोश विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सतिष आबा शिंदे यांनी केले आहे.
■ मोर्चातील प्रमुख मागण्या...
● पिक विमा कंपनीने सर्व महसूल मंडळात सरसकट पिक विमा मंजूर करावा.
● सोयाबीन व इतर पिकांसाठी आग्रीम तात्काळ देण्यात यावा.
● नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे न करता शासनाने सरसकट भरपाई द्यावी.
● हेक्टरी बागायतीसाठी 50 हजार तर जिरायतसाठी 40 हजार मदत जाहीर करावी.
● ई पिक पाहणी अहवालाची जाचक आट रद्द करावी.
● कृषी पंपांना 24 तास उच्च दाबाने विद्युत पुरवठा करण्यात यावा.
● श्रावण बाळ व संजय गांधी योजनेतील सर्व अर्ज तात्काळ मंजूर करण्यात यावे.
● फळबागांना ही नुकसान भरपाई देण्यात यावी.
● नरेगाची अंतर्गत मंजुर कामे तात्काळ सुरू करण्यात यावेत.
● विकास कामावर शासनाने दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी.
● शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नयेत.
● शेती पंपाचे वीज बिल शासनाने भरावी.
stay connected