आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील मुस्लिम युवक समीर शेख गेल्या 6 वर्षापासून वाराणशी (काशी)येथून आणत आहे गंगाजल.. कावड आणून दिला सर्व धर्म सम भाव चा संदेश.

 आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील मुस्लिम युवक समीर शेख गेल्या 6 वर्षापासून वाराणशी (काशी)येथून आणत आहे गंगाजल..
कावड आणून दिला सर्व धर्म सम भाव चा संदेश.




 वाराणशी येथे भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून भाविक भक्त येत असतात.तिथे काशी येथे विश्वनाथ यांचे मंदिर आहे..

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील समीर बादशाह शेख हा गेल्या सहा वर्षांपासून वाराणशीला कावड आणण्यासाठी जात आहे,त्याच्या सोबत आनिकेत गव्हाणे हे दोघे रेल्वे ने गेले होते, गावातील साठ ते सत्तर भाविक भक्त ट्रॅव्हल्स, चार चाकी वाहन जातात तर समीर शेख हा दरवर्षी न चुकता रेल्वे ने जातो, दि.11/11/2022 रोजी वाराणशी येथे गेला. व दि.15/11/2022 रोजी गावाकडे आला, सांगवी पाटण येथील जागृत देवस्थान श्री. भैरवनाथांचे मंदिर आहे, जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करतात, पंचक्रोशीतील पाच ते सहा हजार भाविक भक्त या कार्यक्रमाला दरवर्षी येतात , प्रथम संध्याकाळी नऊ ते अकरा या वेळेस कीर्तन होते, त्यानंतर काशी,पैठण, नागतळा येथून आलेल्या गंगाजल, कवडीचे पाणी देवाला अभिषेक केला जातो, व दुसऱ्या दिवशी नऊ ते अकरा जाहिर हरिकीर्तन होते, व त्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो, समीर शेख म्हणतो की सगळ्यांचा देव एकच आहे,आपण सर्व भारतीय आहोत ,सामजिक, कार्यात तो नेहमी पुढे असतो,गेल्या नऊ वर्षांपासून शिवनेरी ते सांगवी पाटण शिवज्योत आणत आहे,यातून त्याने सर्व समाजाला सर्व धर्म समभावनेचा संदेश दिला..यामुळे समीर शेख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.