*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आष्टीचे आगार प्रमुख यांना दिले निवेदन...*
-----------------
*मागणीला आले यश*
-----------------------------
कडा प्रतिनिधी - अनिल मोरे
कडा ते मांदळी ही बस सेवा कोरोना काळामध्ये बंद होती.
आता दोन वर्षे उलटून गेले तरीही बससेवा सुरू होत नाही.
तरी बससेवा लवकर सुरू करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष रवीकाका ढोबळे यांनी केली आहे.
कडा ते मांदळीला जाण्यासाठी प्रवाशाची खुप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
त्यामुळे आत्माराम बांबाच्या दर्शनाची वारकऱ्यांची ईच्छा अपूरीच होत आहे.
दर एकादशीला वारकरी आत्माराम बाबांच्या दर्शनासाठी जात असतो परंतु, कोरोणामुळे जाता आले नाही.
तरी काही प्रवाशांनी भारतीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवि काका ढोबळे यांना बससुरू करण्यासाठी विनंती केली होती,
त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आष्टीचे आगार प्रमुख यांना निवेदन दिले व आगार प्रमुख यांनी निवेदनाचा स्विकार करुन कडा ते मांदळी बस सुरू केली.
यावेळी तालुका सरचिटणीस सचिन घोडके,काका कर्डिले,
व काही प्रवासी उपस्थित होते.
बससेवा सुरू झाली म्हणून प्रवाशांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आभार मानले.



stay connected