पवन मावळातील कोथूर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीचे आपहरण करून निर्घृण हत्या २४ तासांत आरोपी जेरबंद करण्यास कामशेत पोलिसांना यश

 पवन मावळातील कोथूर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीचे आपहरण करून निर्घृण हत्या
 २४ तासांत आरोपी जेरबंद करण्यास कामशेत पोलिसांना यश





अमोल बोरुडे तेजवार्ता  पुणे - पवन मावळातील कोथूर्णे गावातील एक सात वर्षीय  मुलीचे अपहरण करून तिची  हत्या केल्याची दुर्दैवी घटना  घडली  आहे.या बाबत  कामशेत  पोलिसांनी तपासाची  सूत्र हलवत  24 तासाच्या आत आरोपीला जेरबंद  केले. याप्रकरणी अल्पवीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.2) कामशेत  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर  पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवार  (दि.2) दुपारी 3:30 च्या सुमारास कामशेत  पोलीस ठाण्यामद्ये कोथूर्णे  येथील  अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे  गांभीर्य लक्षात घेता  कामशेत  पोलिसांनी तपासाची  सूत्र हालवत 24 तासाच्या आत  आरोपी तेजस  उर्फ दादा महीपती  दळवी  ( वय 24 वर्ष  कोथूर्णे ता मावळ )याला मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

या गुन्ह्यांतील आरोपी तेजस याच्यावर  पोस्को,363,301 या कलमांतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. याप्रकारणी पुढील  तपास पोलीस निरक्षक संजय जगताप करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर