कोथूर्णे - मावळ बालिका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी - अमोल बोरुडे
बीड - पवन मावळातील कोथूर्णे गावातील एक सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या बाबत कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत 24 तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले. याप्रकरणी अल्पवीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.2) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तरी या घटनेची गंभीर्यता लक्षात घेऊन फास्ट ट्रॅकवर खटला चाववून त्या नराधमाला फासीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा असा प्रकार करण्याचे धाडस कोणीही करणार नाही व तुला लहानग्या मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. अशी मागणी श्री संत सावता माळी युवक संघ बीड जिल्हा संपर्क प्रमुख अमोल बोरुडे यांनी केली आहे.व पुणे जिल्हाच्या वतीने करण्यात येत आहे.

stay connected