मुर्शदपूर जिल्हा परिषद गटातून कर्तुत्वान सर्वसामान्यांना न्याय देणारा उमेदवार डॉ.संतोष कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी द्यावी

 मुर्शदपूर जिल्हा परिषद गटातून कर्तुत्वान सर्वसामान्यांना न्याय देणारा उमेदवार डॉ.संतोष कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी द्यावी



आष्टी। प्रतिनिधी 

मागिल अनेक वर्षांपासून आ.बाळासाहेब आजबे यांचे कट्टर समर्थक एकनिष्ठ पणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणारे डॉ.संतोष कदम यांना मुर्शदपूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊन न्याय दिला पाहिजे. कदम यांच्यासारखा कर्तुत्वान सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता उमेदवार असल्यास निश्चित निवडून येईल, असा सूर समर्थकांकडून व्यक्त करण्यात आला. कदम यांच्या मागे सर्व पदाधिकारी आणि सामान्य जनता असल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाच्या जोरावर पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.


आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आ.बाळासाहेब आजबे यांचे कट्टर समर्थक म्हणून डॉ.संतोष कदम यांना ओळखले जाते नवीन चेहरा,युवक कार्यकर्ते,सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात कोरोना सारख्या भयंकर परिस्थिती मध्ये स्वतः च्या जिवाची पर्वा न त्यांनी रुग्णांची मदत केली,ते डॉ.पदवी असल्याने उच्चशिक्षित आहेत.राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. मुर्शदपुर गट एस सी राखीव सुटल्याने  डॉ.संतोष कदम यांना  उमेदवारी द्यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.त्यांचा दांडगा जनसंपर्क व अनुभव व उच्चशिक्षित असल्याने विजयी होण्यास त्यांची जमेची बाजू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर